अकोला - तेल्हारा तालुक्यातील विद्रूपा नदीला पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क तूटला आहे. तालुक्यातील मनब्दा, अटकळी, टाकळी, पाथर्डीसह विद्रूपा नदीकाठी असलेल्या अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. या भागातील नदी काठची संपूर्ण शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
नदीला आलेल्या पुरामुळे शेतातील पिके वाहून गेली आहेत. यामुळे शेतकरी संकटात पडले आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाकडून भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आता शेतकऱ्यामंधून केली जात आहे. विद्रूपा नदीचा पूर गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीच्या काठी आसलेल्या गावकऱ्यांना याचा सामना करावा लागणार आहे.