अकोला - जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी एकच मतदारसंघ शिवसेनेसाठी राखीव केल्याने सर्वत्र शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. यामुळे त्यांनी पक्ष कार्यालयात साहाय्यक संपर्क प्रमुखांची भेट घेतली.
भाजप-शिवसेनेच्या युतीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी एकच मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. या मतदारसंघातून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी घोषित झाली आहे. यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा 'आदित्य ठाकरे यांच्या रुपाने राजकारणात एक नवीन पर्व'
शिवसैनिकांच्या बूथसंदर्भात चुकीची माहिती तयार करून पक्ष प्रमुखांना देण्यात आल्याचा आरोप पिंजरकर यांनी केला. तसेच बाळापूर मतदार संघातच सेनेची चांगली संघटना असल्याचे दाखवण्यात आले, असे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्ह्यातील सेनेचा स्वतःसाठी फायदा करून घेऊन पक्ष प्रमुखांची दिशाभूल केली आहे, असे श्रीरंग पिंजरकर यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनीही जिल्ह्यातील पक्षाची स्थिती योग्यप्रकारे मांडली नसल्याने भाजपला सरळसरळ मदत करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी सेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, महिला जिल्हा प्रमुख देवश्री ठाकरे तसेच संतोष अनासने, डॉ.विनीत हिंगणकर, चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी विरोध दर्शवला.