अकोला - दोन मजुरांमधील वाद एकमेकांच्या जीवावर उठला. ही घटना एमआयडीसी 4 मधील प्लायमायका एंटरप्राइजेस निर्माणाधीन कंपनीत शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये उत्तर प्रदेश येथील राहणाऱ्या एका मजुराने सोबतच्या मजुराचा दगडाने ठेचून खून केला. त्याचा मृतदेह शौचालयासाठी बांधण्यात येणाऱ्या खड्ड्यात ओढत नेऊन गाढून टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मजुरास अटक केली आहे. भांडणाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अरविंद मनोज विश्वकर्मा असे मृत मजुराचे नाव असून होरीलाल उर्फ अजय श्रीचंदन गौतम असे आरोपी मजुराचे नाव आहे.
अकोला एमआयडीसीत दोन परप्रांतीय मजुरांमध्ये वाद.. एकाने गमावला जीव - अकोली गुन्हे वृत्त
अकोला एमआयडीसी 4 मधील प्लायमायका एंटरप्राइजेस या निर्माणाधीन कंपनीत उत्तरप्रदेशचे मजूर काम करत होते. त्यापैकी दोन मजुरांमध्ये रात्रीच्या वेळी काही कारणामुळे वाद झाला. यातून एका मजुराने दुसऱ्याची हत्या केली.