ETV Bharat / state

तीन दिवसांपासून पुर्णा नदीत वाहून गेलेल्या 'त्या' वृद्धाचा मृतदेह अखेर सापडला

म्हशींना पाणी पाजण्यासाठी दादाराव वानखेडे पुर्णा नदीपात्रात गेले होते. नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने ते नदीत वाहुन गेले होते.

Death of an old man who was swept away in Purna river
पुर्णा नदीत वाहून गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
author img

By

Published : Jul 27, 2020, 3:32 AM IST

अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील एंडली गावातील दादाराव वानखडे हे म्हशींना पाणी पाजण्यासाठी पुर्णा नदीपात्रात गेले होते. त्यावेळी पुर्णा नदीच्या पुरात ते वाहून गेले होते. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने आज (रविवार) त्यांचा मृतदेह दोनवाडा गावाजवळ शोधून काढला.

एंडली गावातील दादाराव वानखडे हे 24 जुलै रोजी पूर्णा नदीजवळ म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घसरल्याने ते नदीच्या पाण्यात ते वाहून गेले होते. त्यांचा शोध न लागल्याने मूर्तिजापूर तहसीलदार यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दीली. पथकाने घटनास्थळ गाठले आणि त्यांचा शोध सुरू केला.

हेही वाचा - संतापजनक! कोरोनाबाधितांना नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले नऊ हजार रुपये..

दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर दादाराव वानखडे यांचा मृतदेह रविवारी दोनवाडा गावाजवळ मिळाला. त्यांच्या मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटली होती. या पथकात ज्ञानेश्वर म्हसाये, अजय जाधव, सूरज ठाकुर, मयूर कळसकार, मयूर सळेदार, अजय डाके, गोकुल तायडे, ऋतीक सदाफळे, शरद महल्ले, कैलास वानखडे आणि दोनवाडा येथील श्रीकृष्ण झटाले, यांच्यासह आदींनी त्यांना मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.