अकोला - आलेगाव येथील धनगर पुऱ्यातील सिंगल फेज रोहीत्रचा शॉक लागून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून शेतकरी थोडक्यात वाचला.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अशोक शालीग्राम महल्ले नेहमीप्रमाणे बैल शेतात चरण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी धनगर पुऱ्यातील सिंगल फेज रोहीत्राचा विज प्रवाह जमीनीत आला होता. त्यावेळी बैल रोहीत्रा जवळून जात असताना त्याला शॉक लागला. त्यामुळे बैलाचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यातून अकोल्यात येणारी अवैध देशी दारू जप्त
बैलामागे असलेल्या महल्लेंच्या पायाला मुंग्या आल्याने त्यांनी माघारी धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने ते बचावले. दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी महल्ले यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या कामांमध्ये बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.