ETV Bharat / state

महामार्गाजवळ ढाब्यावर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय - akola police

मूर्तिजापुरातील कंझारा टी पॉईंटजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून संबंधित मृत व्यक्ती 55 वर्षांची आहे.

crime in akola
महामार्गाजवळ ढाब्यावर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय
author img

By

Published : Nov 19, 2020, 3:28 PM IST

अकोला - मूर्तिजापुरातील कंझारा टी पॉईंटजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून संबंधित मृत व्यक्ती 55 वर्षांची आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

crime in akola
महामार्गाजवळ ढाब्यावर काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह आढळला; तपास सुरू

मृताचे नाव अशोक मिलके असून तो हेन्डज येथील सतनाम सिंग यांच्या ढाब्यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशोक मिलके याने 16 नोव्हेंबर रोजी मालकाकडून दीड हजार रुपये घेतले होते. अमरावती येथील बहिणीकडे जात असल्याचे सांगून तो निघून गेला, असे मालकाने सांगितले. मात्र आज ही व्यक्ती मृत अवस्थेत सापडली.

मूर्तिजापूर पोलीस आणि वंदे मातरम आपत्कालीन पथकाने मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरीही तपासणी अहवालात संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.