ETV Bharat / state

अकोल्यात गॅस सिलिंडरचा उडाला भडका, चौघे जण गंभीर जखमी

अकोल्यातील विनोद ताळे यांच्या घरातील गॅसची नळी फुटल्यामुळे गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि घरात आगीचा भडका उडाला यामुळे चारजण जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Apr 21, 2019, 12:03 AM IST

घरातील छायाचित्र

अकोला - हिवरखेड येथील बार्गनपुऱ्यात आज सायंकाळी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे वृद्ध महिला, ३ वर्षांच्या चिमुकलीसह तिचे आई-वडील भाजले आहेत. दुर्गा ताळे यांनी गॅस पेटवताच आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली.

सिलिंडरचा भडका उडालेले घर

विनोद ताळे यांच्या घरातील गॅसची नळी फुटल्यामुळे गॅसचा विसर्ग संपूर्ण घरात झाला होता. याच दरम्यान दुर्गा यांनी गॅस पेटवण्यासाठी आगपेटीची काडी पेटवताच आगीचा भडका उडाला. यावेळी तिथे असलेले विनोद ताळे, वृद्ध देवकाबाई ताळे, आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी भक्ती ताळे हे सर्वजण भाजले गेले. शेजारच्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या सर्वांना हिवरखेड येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेबाबत हिवरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

Intro:अकोला - गॅसची नळी फुटलेली असल्याने त्यातून विसर्ग होत असलेल्या गॅस घरात साचला. घरात आलेल्या दुर्गा विनोद ताळे यांनी गॅस पेटविताच भडका उडाला. या घटनेत वृद्ध महिला, 3 वर्षांची चिमुकली सह तिचे आई व वडील हे भाजल्या गेले. ही घटना हिवरखेड येथील बार्गन पुऱ्यात 20 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. जखमींना अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Body:विनोद रामदास ताळे यांचे छोटे घर आहे. या घरातच स्वयंपाक खोली आहे. त्यातील गॅसची नळी ही फुटलेली असल्याने त्यातील गॅसचा विसर्ग झाला. त्यामुळे घरात गॅस साचला. दुर्गा विनोद ताळे यांनी गॅस पेटविण्यासाठी आगपेटीची काळी उगविताच घरात भडका झाला. या भडक्यात घरातील संपूर्ण कुटुंब जळाले. त्यावेळी तिथे असलेले विनोद ताळे, वृद्ध देवकाबाई रामदास ताळे, आणि 3 वर्षांची भक्ती विनोद ताळे हे सर्वजण भाजल्या गेले. शेजारच्याना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या सर्वांना हिवरखेड येथील प्राथमिक रुग्णालय आणि नंतर अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. तसेच हिवरखेड पोलिसांनाही माहिती दिली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.