अकोला - दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत धाव घेतली आहे. बाजार समितीत मंगळवारी तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी गर्दी केली आहे. आज तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यातय येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे पिकात घट झाली असून, सोयाबीनची आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. दिवाळी सण आणि रब्बी हंगामातील पेरणीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजवर विदर्भातील शेतकऱ्यांची नाराजी, सरकार विर्दभासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप
हेही वाचा - दर्यापूरात शेतकऱ्याने फिरवला ५८ एकर कपाशीवर ट्रॅक्टर; कपाशीवर बोंंड अळीचा उद्रेक