अकोला - कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठ दिवसांत वाढली आहे. जिल्ह्यात शनिवारी 90 कोरोना रुग्ण आढळले आहे. तर सध्या 267 रुग्ण हे सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही अकोलेकरांसाठी चिंताजनक ठरत आहे.
जिल्ह्यात दिवसभर 526 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 70 जण पॉझिटिव्ह सापडले. तर आरटीपीसीआर मध्ये 15 आणि रॅपिड ॲन्टीजेन चाचणीत पाच असे एकूण 90 जण पॉझिटिव्ह सापडले आहे. सध्या 267 जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एक हजार 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत 56 हजार 762 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.