अकोला - काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी अकोट येथील मतदान केंद्रावर आज मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आपल्या घराजवळील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदारांच्या रांगेत उभे राहून ते मतदान केंद्रांमध्ये केले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक काँग्रेस पदाधिकारीही उपस्थित होते. त्या सर्वांनी मिळून एकत्र मतदान केल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी रवाना झाले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच भाजप काँग्रेस यांनी मतदान केले. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर हे दुपारी ४ वाजता पोद्दार स्कूलमध्ये मतदान करणार आहेत.