अकोला - अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्र्यांविरोधात व्हिडिओ जारी केला. यामध्ये तिने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली; आणि वादाला तोंड फुटले. आता कंगनाविरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे, म्हणजे त्या पदाचा अपमान असल्याचे तक्रारदार शरद झांबरे यांनी म्हटले आहे. यासाठी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याती मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा व्हिडिओ 13 कोटी जनतेचा आणि मुख्यमंत्री पदाचा अपमान आहे, असे ते म्हणाले.
आजपर्यंत कोणीही मुख्यमंत्रीपदाचा अशाप्रकारे अपमान केला नाही. मात्र, कंगनाने मुख्यमंत्र्यांना आव्हान देत त्यांचा पदाचाही अपमान केल्याने कंगना विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी झांबरे यांनी केली आहे. यावेळी सुधीर काहकर, सचिन थोरात, राजेश बेंडे, मनोज गायकवाड हे देखील उपस्थित होते.