अकोला: शासकीय विश्रामगृह येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, इंदूमिलच्या जागेच्या संदर्भात चर्चा झाली. 130 फुटांचा पुतळा आहे. त्याची एकाचवेळी रेखनिका होऊ शकत नाही. जर आपण पीस बाय पीस त्याची रेखनिका केली तर कुठल्याही समितीला निर्णय घ्यायला सोपे होईल. एकाचवेळी 130 फुटाचा रेखनिका आपण जर केली तर त्याच्यावर समिती काही निर्णय देऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
अधिकारी हेकेखोर असल्याची टीका: त्यासंदर्भात मी त्यांना सांगत होतो की, ती समिती आता अडकली आहे. मला तीन दिवसांपूर्वी मला समाज कल्याण खात्याचा अधिकाऱ्याचा फोन होता की सर्टीफाई करायला या. मी त्यांना सांगितले की, मी सर्टीफाई करेल. परंतु, मी त्यांना म्हटले की, नोएडामध्ये जी संस्था आहे, त्यांनी ही तुम्हाला सल्ला दिला. तो सल्ला आपण मान्य केला नाही. तुम्ही त्यांचा सल्ला का ऐकत नाही. तुम्ही जर मूर्तिकार असाल तर तुम्हीच सल्ला घ्या. अधिकारी हा कोणाचे ऐकत नाही, तो हेकेखोर असतो, असे मी त्यांना सांगितले. पुतळ्याचा एक एक भाग अप्रूव्ह करावे लागते. त्याच्याशिवाय तो पुतळा उभा राहू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वेळेआधी रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन: तसेच पीडब्लूडीचा रस्ता संपतो त्या रस्त्यांच्या बांधणीबाबत आम्ही जिल्हा परिषद मार्फत योजना आखत आहोत. ज्या शेतकऱ्यांना रस्ता हवा असेल त्यांनी बिडीओकडे पत्र द्यावे, परवानगी पत्र, दान पत्र असे द्यावे. त्यांच्यासाठी रस्ता आम्ही उभा करू, या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी अर्ज, नकाशा, सहमती पत्र दिल्यास नियोजन करता येईल. निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. आमचा कालावधी संपण्याआधी आम्ही हे रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन देतो, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मी उध्दव ठाकरेंसोबत: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील न्यायालयाच्या निर्णयावरून मी राजकीय पक्ष म्हणून उध्दव ठाकरे सोबत आहो, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती शिरसाट यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप: आरएसएसच्या नेत्यांनी तुकाराम महाराजांच्या कुठल्यातरी एका जयंतीला हजेरी लावली आहे काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मात्र पुढच्या वर्षी ते सुद्धा हजेरी लावतील तेही या आरोपातून मुक्त होण्यासाठी असे वक्तव्यसुद्धा त्यांनी केले. जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोपाल राऊत होते. तर ठराव वाचक ऍड. संतोष रहाटे, स्वागताध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, प्रा. अंजली आंबेडकर, वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह वंचितचे इतर पदाधिकारी आणि ओबीसी नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
हेही वाचा: Mumbai Crime: तृतीयपंथीची दादागिरी थांबेना; प्रवाशाला मारहाण करून हिसकावला मोबाईल