अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी पारिवारिक चर्चा केली. त्यांच्यासोबत स्थानिक आमदारही उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मुलीचा स्वागत समारोह अकोल्यात आहे. या समारोहासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आदी उपस्थित होते. रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे हे भाजपचे दोन खासदार मोठ्या मताधिक्याने आणि चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांची भेट घेतल्याचे समजते.
दरम्यान, विजयानंतर ही भेट राजकीय दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. तसेच केंद्रात त्यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेने रंगत रंगली आहे. दरम्यान, संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री येणार असल्याच्या महितीनंतर पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पत्रकारांची केली ओळख
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत त्यांनी काहीच बोलणार नाही, फक्त ओळख करून घ्या असे म्हणत त्यांच्यासोबत बोलून त्यानंतर ते निघून गेले.