अकोला : बाळ हुशार की बदमाश हे जुने लोक बाळाला पाळण्यात पाहील्यावर सांगत होते. त्यावरूनच लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात, अशी एक म्हण निर्माण झाली असल्याचे बोलले जाते. अकोल्यातील चिन्मयबद्दल ( Chinmay Savji of Akola ) असेच काहीशे म्हणता येईल. चिन्मयने अवघ्या साडेपाच वर्षांत अकोल्याचे नाव देशपातळीवर कोरले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्याने आठ मिनिटं झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित कविता सादर केली आहे. त्याने कुमारी सुभद्रा चव्हाण यांनी लिहिलेली 'खूप लडी मर्दानी वोतो झासी वाली रानी थी' कविता गायली आहे.
त्याने ही कविता आठ मिनिटे न थांबता सर्व श्रोत्यांसमोर गायली. तो फक्त पाच वर्ष दहा महिन्याचा आहे. इतक्या कमी वयात त्याने ही कविता सादर करून उपस्थितांची नव्हे तर परीक्षकांची देखील मने जिंकली आहेत. त्याच्या नावाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records ) मध्ये झाली आहे. त्याच्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चिन्मय मंदार सावजी ( Chinmay Mandar Savji ) हा माउंट कारमेल या शाळेत अप्पर के. जी. मध्ये शिक्षण घेत आहे. तिसऱ्या वर्षांपासून तो जगातील सर्व देशांच्या राजधान्या त्याने पाठ केल्या आहेत. चिन्मयचे वडील हे डेन्टिस्ट असून त्याची आई सुरुची या शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. चिन्मयला मोठे झाल्यानंतर अंतराळवीर व्हाययचे आहे. तो अभ्यासातही खूप हुशार आहे. तसेच त्याला गणित विषयात खूप रुची आहे. आजी-आजोबांचा आज्ञाधारक असलेला चिन्मयला बॅडमिंटन खेळण्याचा आनंद आहे. त्याने इतक्या कमी वयात साध्य केलेले यश हे इतर पालक आणि मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.