अकोला - विद्युत प्रवाहाची तार तुटल्यामुळे रेल्वेगाड्या जवळपास साडेतीन तास उशिरा धावल्या. कुरुमजवळ घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने ही तार दुरुस्त करीत रेल्वे वाहतूक रात्री साडेआठ वाजता सुरळीत केली. सगळ्या गाड्या या बडनेरा येथे थांबविण्यात आल्या होत्या.
माना कुरुम दरम्यान हाय व्होल्टेजची तार तुटली. यामुळे सायंकाळी ५ वाजतापासून रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीसाठी ब्रेकडाऊन करीत तुटलेली तार जोडली. या कामास तब्बल साडेतीन तास वेळ लागला. रात्री साडेआठ वाजता रेल्वे गाड्याची वाहतूक सुरळीत करण्यात आली. या ब्रेकडाउनमुळे कुर्ला, हावडा, शालिमार, मेल, विदर्भ एक्स्प्रेस या गाड्या उशिरा धावल्या. दरम्यान, सर्व गाड्या मूर्तिजापूर, बडनेरा येथे थांबविण्यात आल्या होत्या.