अकोला - तेल्हारा शहरात एका धावत्या चारचाकीने मंगळवारी (दि. 28 जानेवारी) रात्री पेट्रोल पंपासमोर पेट घेतला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची एकच धांदल उडाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घरनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत चारचाकी जळून खाक झाली होती. ही घटना तेल्हारा शहरातील केवलराम पेट्रोल पंपासमोर घडली.
पेट्रोल पंपासमोरून चारचाकी वाहनाने (एम एच 30 एल 8817) धावताना अचानक पेट घेतला. आग लागल्याचे वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने लागलीच त्याने वाहन रस्त्याच्या बाजुला नेली. त्यामुळे जीवितहानी टळली.
हेही वाचा - 'बंददरम्यान झालेल्या घटनांवेळी पोलिसांची भूमिका बघ्याची'