ETV Bharat / state

अकोल्यात कारमध्ये गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू, २ वर्षांपासून होती बंद अवस्थेत

आजी आणि मावशीसोबत प्लास्टीक कचरा वेचण्यासाठी आलेल्या बालकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे.

मृत तानेश विष्णू बल्लाळ,
author img

By

Published : Jun 5, 2019, 12:25 PM IST

Updated : Jun 5, 2019, 12:56 PM IST

अकोला- एका बालकाचा गाडीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरीफाट्याजवळच्या आलेवाडीत ही घटना घडली. तानेश विष्णू बल्लाळ, असे मृत मुलाचे नाव आहे.

तानेश आपल्या आजी आणि मावशीसोबत प्लास्टीक कचरा वेचण्यासाठी आलेवाडीमध्ये आला होता. आलेवाडीमध्ये काटेरी झुडपात उभ्या असलेल्या कारमध्ये तो बसला. मात्र, कारचे दरवाजे अचानक बंद झाले. त्यामुळे बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी उन असल्याने तो सावली मिळावी यासाठी गाडीत बसला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गाडीबद्दल चौकशी केली असता गेल्या २ वर्षांपासून गाडी बंद अवस्थेत उभी असल्याचे गाडीचे मालक नागेश कराळे यांनी सांगितले. यासंदर्भातील पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.

Intro:अकोला - अकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे गाडीत गुदमरुन एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ जुनच्या रात्री उघडकीस आली. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव तानेश विष्णू बल्लाळ असून तो कचरा, प्लॅस्टिक पिशव्या वेचण्याकरीता आलेवाडीत आला होता.Body: दहीहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेवाडी येथे काटेरी झुडपात कार क्र. एमएच - ४३ - एन - ९९११ उभी होती.  या गाडीचा दरवाजा उघडून तानेश विष्णु बल्लाळ (अण्णाभाऊ साठे नगर अकोट फाईल अकोला) हा   गाडीत बसला. गाडीचे दरवाजे आतमधुन बंद झाल्याने बालकाचा गूदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे. हा बालक आपल्या आजी व मावशी सोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याकरीता आलेवाडी गावात आला होता. दुपारी खुपच ऊन्ह असल्याने या गाडीत तो बसण्याकरीता गेला असल्याचा तर्क काढण्यात येत आहे. गाडीचे मालक नागेश कराळे यांनी ही गाडी दोन वर्षापासून बंद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेची चौकशी व पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.Conclusion:सूचना - सोबत फोटो आहे.
Last Updated : Jun 5, 2019, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.