ETV Bharat / state

गृहमंत्र्यांवरील आरोप पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास नाही - आमदार सावरकर - गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी आयुक्त व पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीमधील मंत्री अनेक प्रकरणात अडकले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपाने निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.

bjp-protests-for-home-minister-anil-deshmukhs-resignation-in-akola
आमदार सावरकर
author img

By

Published : Mar 21, 2021, 2:45 PM IST

अकोला - राज्याच्या गृहमंत्री यांच्यावर झालेला आरोप हा पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास नसल्याचा आरोप करीत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खुले नाट्यगृह चौकात निदर्शने केली. पोलिसांच्या बंदोबस्तात नारेबाजी करण्यात आली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी आयुक्त व पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला. महाविकास आघाडीमधील मंत्री अनेक प्रकरणात अडकले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपाने निदर्शने करून आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अकोल्यात भाजपाचे आंदोलन..
आमदार गोवर्धन शर्मा यांनीही तिघाडी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. राज्य सरकार ही कुठल्याही परिस्थितीत राज्यातील जनतेला न्याय देऊ शकत नाही. राज्यातील राजकीय क्षेत्रात बिघाडी करणाऱ्या या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे असे भष्ट्राचारी नेते राज्याचा इतिहास आणि येथील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे. त्यामुळे या सरकारचे आता जास्त दिवस राहिले नसल्याचा आरोप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी कोतवाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पोलिसांच्या समोरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व गृहमंत्री यांच्याविरोधात नारेबाजी केली.

हेही वाचा -परमबीर सिंहांच्या लेटर बाॅम्बने सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.