ETV Bharat / state

अकोल्यात संजय धोत्रे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील घटनेचा आढावा घेतला. मतदान संथ गतीने सुरू असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

author img

By

Published : Apr 19, 2019, 2:54 AM IST

भाजप उमेदवार संजय धोत्रे

अकोला - भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी कुटुंबासह पळसो बढे येथील त्यांच्या मूळ गावी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील संथगतीने सुरू असलेल्या मतदानाबाबत नाराजी व्यक्त केली.

संजय धोत्रे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

अकोला लोकसभा मतदार संघात संजय धोत्रे हे चौथ्यांदा उमेदवार म्हणून उभे असलेले आहेत. ते सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर आले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुहासिनी धोत्रे, त्यांचा मुलगा अनुप धोत्रे, त्यांचे भाचे आमदार रणधीर सावरकर, हे सर्वजण मतदान केंद्रावर आले. मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील घटनेचा आढावा घेतला. मतदान संथ गतीने सुरू असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी गावातील परिचितांसोबत संवाद साधला. मतदान करून परिवारासह परत अकोल्याकडे रवाना झाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.