मुंबई- चारच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेली मुंबई येथील भूमिगत मेट्रो आज सहारा स्थानकादरम्यान 25 मिनिटे भुयारात अडकली. प्रवाशांना 10 मिनिटांनी मेट्रो बाहेर पडा, अशी उद्घोषणा करण्यात आली, त्यानंतर 15 मिनिटांनी पुन्हा मेट्रो सुरू करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते गोरेगावदरम्यान पुणे भूमिगत मेट्रो वाहिनी मोठ्या दिमाखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच सुरू करण्यात आलीय. मात्र ही भूमिगत मेट्रो बुधवारी सकाळी 11 वाजता सहार मेट्रो रेल्वे स्थानकादरम्यान बंद पडली. भुयारात ही मेट्रो रेल्वे अचानक बंद पडल्यामुळे मेट्रोमधील प्रवाशांची तारांबळ उडालीय. सुरुवातीला त्यांना काय करावे हेच कळेना. अखेरीस 10 मिनिटांनंतर प्रवाशांनी आपत्कालीन स्थितीसाठी देण्यात आलेले बटन दाबून माहिती देण्याचा प्रयत्न केलाय.
मेट्रो बंद पडल्याची उद्घोषणा : स्टॉप बटन दाबल्यानंतर अखेरीस ही मेट्रो गाडी बंद पडण्याची उद्घोषणा गाडीत करण्यात आलीय. त्यानंतरही गाडी सुरू होत नाही हे लक्षात येताच प्रवाशांनी पुन्हा बटन दाबलं. त्यानंतर गाडीत उद्घोषणा होऊन प्रवाशांना ताबडतोब गाडी बाहेर पडण्यास सांगण्यात आले. तसेच प्रवाशांसाठी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.
25 मिनिटांनंतर गाडी सुरू : फलटावर उभ्या असलेल्या प्रवाशांसाठी पुन्हा एकदा उद्घोषणा करण्यात आली आणि सांगण्यात आले की, ही गाडी आता पुन्हा दुरुस्त झाली असून, ही गाडी तुम्हाला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवेल. मात्र या सर्व गोंधळात प्रवाशांचे ऐनकामाच्या वेळेची 25 मिनिटे वाया गेलीत.
तांत्रिक बिघाडामुळे बंद : मेट्रो रेल्वे गाडी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती, ती काही वेळाने पुन्हा दुरुस्त करण्यात आलीय. प्रवाशांनी चिंता करण्याचे कारण नव्हते, असे मेट्रो रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भूमिगत मेट्रो रेल्वेत चौथ्याच दिवशी भुयारात अडकण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढवल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
हेही वाचाः