ETV Bharat / state

Bike Accident In Akola : दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; तिघांचा मृत्यू

अकोल्यात दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज ( Bike Accident In Akola ) उघडकीस आली आहे. ही घटना वाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री घडली होती. या घटनेत एका दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

Bike Accident In Akola
दुचाकीच्या समोरासमोर भीषण धडक
author img

By

Published : May 9, 2022, 11:57 AM IST

Updated : May 9, 2022, 2:45 PM IST

अकोला - दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज ( Bike Accident In Akola ) उघडकीस आली आहे. ही घटना वाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री घडली होती. या घटनेत एका दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. यातील किरकोळ जखमी असलेल्या महिला व एका मुलाला त्यांचे नातेवाईक वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेऊन गेले असल्याचे समजते. दरम्यान, मृतकांची नावे अद्यापही कळू शकलेली नाही. या घटनेचा तपास बाळापूर पोलिस करीत आहे.

तिघांचा मृत्यू - वाडेगाव येथून पातुरकडे जाणारी दुचाकी एमएच 28 एस 7956 वर एक पुरुष, एक महिला आणि आठ वर्षांचा मुलगा असे तिघेजण पातुरकडे जात होते. तर त्यांच्या समोरून येणारी दुचाकी एमएच 30 बीपी 9574 ही दुचाकी पातुरकडून वाडेगावकडे येत होती. या दुचाकी वर दोन जण बसलेले होते. वाडेगाव जवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये पातुरकडून वाडगावकडे जाणाऱ्या दुचाकीवरील एका 50 वर्षीय व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील पुरुषाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे पाठविले. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, यातील आणखीन एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर किरकोळ जखमी असलेले महिला व आठ वर्षाचा मुलगा यांना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांचे नातेवाईक घेऊन गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Bike Accident In Akola
दुचाकीच्या समोरासमोर भीषण धडक

बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत - या घटनेतील जखमी व मृतकांची नावे पोलिसांना अद्यापही कळू शकली नाही. या संदर्भामध्ये पोलीस माहिती घेत आहेत. या घटनेचा तपास बाळापुर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे करीत आहेत.

हेही वाचा - Fire In Mahakali Nagar : नागपूरच्या महाकाली नगरमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या झाल्या खाक

Last Updated : May 9, 2022, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.