अकोला : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील तिसरा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे.
यात्रा रोखायची असेल तर भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात आणि आनंदात स्वागत केले जात आहे. आज एक वाजता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.सावरकरांनी इंग्रजांनी सावरकरांना लिहलेलं पत्र त्यांनी यावेळी वाचून दाखवलं. यात्रा रोखायची असेल तर रोखा, प्रयत्न करा. तुम्हाला यात्रेत काही चुकीचं वाटत असेल, जरूर रोखा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. आम्हाला भारताला जोडायचं आहे. ही यात्रा म्हणजे एक विचार आहे. एक काम करण्याची पद्धत आहे.
देशात दहशतीचं वातावरण भाजपच्या द्वेषपूर्ण, हिंसात्मक एकीकडे विचार आहे. तर आमचं प्रेमाचं, बंधुभावाचा विचार आहे. ही दोन विचारांची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, मागील आठ वर्षापासून देशात दहशतीचं वातावरण आहे. ही लढाई दोन विचारांची आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमकुवत नाही. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. युवकांना विश्वास नाही की, त्यांना रोजगार मिळेल. डिग्री आहे पण नोकरी नाही. लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण केली जात आहे.
भारत जोडो यात्रा हा एक विचार शेतकरी संकटात आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. महाराष्ट्रात शाळा बंद केले आहेत, त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्न मांडत आहोत, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी भारत जोडो यात्रे शिवाय पर्याय नाही. भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही. जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी परखडपणे सांगितले.
दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची भारत जोडो यात्रे दरम्यानची राहुलजी गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला येथे पार पडली. यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे, तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यातून मला खूप काही शिकायला मिळाले.
काँग्रेसच्या विचारांची ही भूमी महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा येथेच राहण्याचा विचार का केला असावा ? याचे उत्तर मला या विदर्भाच्या भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे. सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते. त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले, हे सांगताना राहुलजी गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला.
देश तुटलेला नाही महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्ष तुरुंगात डांबले होते, पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. हा या दोन विचारधारेतील फरक आहे. एक गांधींची विचारधारा तर दुसरी सावरकरांची. देश तुटलेला नाही तर मग भारत जोडो पदयात्रेची गरज काय असा प्रश्न भाजपा करत आहे.पण मागील ८ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलेले आहे.जनतेचा आवाज ऐकला जात नाही, शेतकरी, तरुण, कष्टकरी यांचा आवाज सरकार ऐकत नाही. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही.
न्यायपालिकाही यातून सुटलेल्या नाहीत देशात अनेक समस्या आहेत पण त्या सरकार ऐकून घेत नाही, द्वेष, हिंसा पसरवून भीतीच्या सावटाखाली जनतेला ठेवले जात आहे. स्वायत्त संस्थांवर सरकारचा दबाव आहे. न्यायपालिकाही यातून सुटलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत जनतेचा आवाज ऐकण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. दररोज हजारो लोक त्यांच्या व्यथा, वेदना, समस्या मांडत आहेत, त्यासाठीच ही पदयात्रा आहे. शेतकरी आत्महत्यांसंदर्भात उत्तर देताना राहुलजी गांधी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या ही फक्त विदर्भातील समस्या नाही तर देशभरातील शेतकऱ्यांची समस्या आहे.
शेतकऱ्यांचे रक्षण करणे सरकारची जबाबदारी शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील. तर देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या या बळीराजाला आधार देण्याची, मदत करण्याची, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. युपीए सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती. आता केंद्रातील भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही. त्यांना मदत देणे तर दुरची बाब आहे. तरुणांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. तरुण मुले मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षणावर खर्चही जास्त होत आहे पण इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपण इंजिनिअर होऊच याची खात्री नाही. नोकऱ्या नाहीत त्यामुळे तरपणांचे भविष्य, त्यांची स्वप्ने अंधकारमय झाली आहेत.
यांची उपस्थिती या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. ४० मिनिटे पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. व महाराष्ट्रातील पत्रकारांसमवेत छायाचित्रही काढले. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे, कपिल ढोके, डॅा. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.