ETV Bharat / state

साप आणि मुंगसाची लढाई; पाहा व्हिडिओ - अकोल्यात साप आणि मुंगसाची लढाई

अकोल्यातील पारडी गावातील हा व्हिडिओ असल्याचे समजते. रस्त्याच्या मधोमध कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरू झाली. या लढाईतील मुंगूस तसा लहान दिसत होता. मात्र नाग चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगूसाने नागाला जेरीस आणले. साप आणि मुंगसाची लढाईचा हा प्रकार प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपला.

साप आणि मुंगसाची लढाई
साप आणि मुंगसाची लढाई
author img

By

Published : Sep 12, 2021, 5:30 PM IST

Updated : Sep 12, 2021, 5:44 PM IST

अकोला - मनुष्याच्या लढाईचे आपण बऱ्याचवेळा प्रत्यक्षदर्शी ठरत असतो. मात्र प्राण्यांच्या लढाईचे प्रत्यक्षदर्शी हे वन्यप्रेमी ठरतात. त्यांच्याकडून ऐकलेल्या प्राण्यांमधील लढाईचा थरार हा अंगावर शहारे आणणारा असतो. मात्र, प्राण्यांची एकमेकांबद्दल असलेली टशन पाहण्याचा आनंद काही औरच असतो. असाच थरार अकोल्यात घडला आहे. या लढाईचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. मुंगूस आणि सापाच्या लढाईचा हा एक विलक्षण क्षण बघणाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे.

साप आणि मुंगसाची लढाई

मुंगूस आणि साप यांच्या दोघांचे शत्रुत्व सर्वांनाच माहित आहे. हे दोघेही एकमेकांचे अजातशत्रू आहे, असे समजले जाते. साप आणि मुंगूस हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की, त्यांच्यात लढाई सुरू होणारच यात शंका नाही. अकोल्यातील पारडी गावातील हा व्हिडिओ असल्याचे समजते. रस्त्याच्या मधोमध कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरू झाली. या लढाईतील मुंगूस तसा लहान दिसत होता. मात्र नाग चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगूसाने नागाला जेरीस आणले. साप आणि मुंगसाची लढाईचा हा प्रकार प्रत्यक्ष बघणाऱ्यांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपला.

हेही वाचा - विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात; संत्र्याची गळ थांबता थांबेना...

Last Updated : Sep 12, 2021, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.