अकोला - सर्व विभाग एकत्रित करून नागरिकांच्या समस्या आणि कामे एकाच ठिकाणी सोडविण्यासाठी ही कर्तव्य यात्रा ( Bachchu Kadu on Kartvya Yatra ) काढण्यात आली आहे. 'घंटो का काम मिनटो में' या वाक्यावरून नागरिकांची कामे तत्काळ करण्याचा ( fast work for people in Akola ) मानस या माध्यमातून करण्यात येत आहे. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरेल असा आत्मविश्वास कर्तव्य यात्रेत पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
कर्तव्य यात्रेदरम्यान मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा ( Kartvya Yatra in Janbha ) या पुनर्वसित गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले, की माझे नाव होत आहे. पण, काम अधिकारी करीत आहेत. अनेक महिन्यांपासून अडकलेली कामे तत्काळ करण्यासाठी ( Bacchu Kadu on new initiative ) हा उपक्रम आहे. सर्वच कामे एका ठिकाणी करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. जोपर्यंत सर्वांची कामे होणार नाही, तोपर्यंत मी येथून जाणार नाही, असे पालकमंत्री कडू म्हणाले.
हेही वाचा-Sanjay Raut On Investigation Institution : हे 2024 पर्यंत सहन करावे लागेल;राऊतांचा सूचक इशारा
पुनर्वसन अधिकारी श्रीराम हजारे यांचे कौतुक
पुढे ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण म्हणायचे की अधिकाऱ्यांनी हो म्हणायचे आणि नेत्यांनी नाही म्हणायचे असे आधी होते. परंतु, आता यापेक्षा वेगळे करून नागरिकांची कामे सोडविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामे करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री बच्चू कडू शेवटी म्हणाले. बरेज रोहणा आणि रोही ही गावे पूर्ण पुनर्वसित करणार आहोत. यावेळी पालकमंत्र्यांनी पुनर्वसन अधिकारी श्रीराम हजारे यांचे कौतुक केले.
हेही वाचा-Russia Ukraine Crisis : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इशारा.. रशियाने नाटो देशांत प्रवेश केला तर अमेरिका करेल 'असं' काही
सर्वच विभागांचे स्टॉल लावले
सर्वांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत, यासाठी सर्वच विभागाचे स्टॉल येथे लावण्यात आले होते. यावेळी ज्यांची कामे रखडलेली होती, त्यांची कामे तत्काळ करून देण्यात आली. महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह आदी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या कार्यक्रमाला मूर्तिजापूर सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पुनर्वसन अधिकारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा-War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO