ETV Bharat / state

अकोल्यात भाजपा व्यापारी प्रमुखावर प्राणघातक हल्ला, 20 हजार लुटले

अज्ञात व्यक्तींनी बाळापूर तालुक्यातील हातरुन येथील भाजप व्यापारी प्रमुख तथा औषधालयाचे चालक सुभाष अग्रवाल यांच्यावर हल्ला करत दुकानातील 20 हजार रुपये लुटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) घडली आहे.

सुभाष अग्रवाल
सुभाष अग्रवाल
author img

By

Published : Nov 18, 2020, 7:03 PM IST

अकोला - बाळापूर तालुक्यातील हातरुन येथे औषधांचे दुकान चालविणारे तथा भाजप व्यापारीप्रमुख सुभाष अग्रवाल यांना अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी मारहाण केली. हे हल्लेखोर मंगळवारी रात्री त्यांच्या दुकानात शिरले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांनी मारहाण केली. दुकानातील गल्ल्यातील 20 हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हातरुन येथे मंगळवारी आठवडी बाजार होता.

उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातरून येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात सुभाष अग्रवाल जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये बसले होते. यावेळी दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण करत चाकूच्या धाकावर अंदाजे 20 हजार रुपये लुटून नेले.

हल्लेखोरांचा शोध सुरू

हातरुन हे गाव मोठे आहे. येथील साप्ताहिक बाजार मोठा भरतो. आजूबाजूची गावातील ग्रामस्थ येथे बाजारात येतात. बाजारातील गर्दी कमी झाल्यानंतर हल्ल्याचा प्रकार घडल्याचे समजते. हे हल्लेखोर कोण होते हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.