ETV Bharat / state

प्रचार तोफा थंडावल्या; विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर - प्रचाराचा शेवटचा दिवस

उमेदवार छुप्या पद्धतीने विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर भर देत आहेत. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी लावलेल्या फलकांना काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Oct 20, 2019, 3:19 AM IST

अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी थांबला. तरी, उमेदवार छुप्या पद्धतीने विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर भर देत आहेत. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी लावलेल्या फलकांना काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रचार तोफा थंडावल्या

हेही वाचा - 'भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत'; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांचे उमेदवारांना आश्वासन

जाहीरपणे होणारा प्रचार आता छुप्या पद्धतीने सुरू झाला आहे. सर्व उमेदवार विजयासाठी जातीनिहाय गणिते जुळवण्यात दंग आहेत. त्यादृष्टीने विविध समाजांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी उमेदवार व त्यांचे सहकारी रात्रीचा दिवस करत आहेत. मतदार वळवण्यासाठी उमेदवार परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या परिश्रमाचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे.

Intro:अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी थांबला. दोन दिवसांनी निवडणूक होणार असली तरी मात्र छुप्या पद्धतीने प्रचार दुपटीने वाढला आहे. रात्रीचा दिवस करण्यात उमेदवार आणि त्यांचे सहकारी कामाला लागले आहे.

Body:विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आवाज सायंकाळी सहा वाजता थांबला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देत सर्वच ठिकाणी उमेदवारांनी लावलेल्या फलकांना काढण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. दरम्यान, जाहीरपणे होणारा प्रचार आता छुप्या पद्धतीने सुरू झाला. प्रत्येक उमेदवार विजयासाठी जातीनिहाय गणिते जुळविण्यात दंग झाले आहे. त्यादृष्टीने मोठ्या संख्येने नव्हे तर कमी संख्याच्या जातीच्या या सोबतच विविध धर्मांच्या प्रमुख, नेते व पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी उमेदवार व त्यांचे सहकारी रात्रीचा दिवस करण्यात गुंग झाले आहे. तर एखाद्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन मतदार वळविण्यात उमेदवार परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या परिश्रमाचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.