अकोला - आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आशा वर्कर्स व गतप्रवर्तक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आशा वर्कर्सनी तोंडावर काळ्या पट्टया बांधून निषेध व्यक्त केला.
आशा वर्कर्स व गट प्रवर्तक राज्य कृती समितीचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. राज्यभरात कामावर सुध्दा बहिष्कार टाकलेला आहे. आशा कामगारांना 73 प्रकारची कामे ज्यांच्यामध्ये लसीकरण, सर्व्हे, आरोग्याबाबत प्रबोधन आदी कार्यक्रम गावागावात फिरून घरोघरी जाऊन करावे लागतात. ही कामे केल्याच्या नतंर सुद्धा आशा वर्कर्सचे सरासरी उत्पन्न 2 हजार 500 रुपये एवढे आहे. हे उत्पन्न अतिशय कमी असल्यामुळे वेळोवेळी शासनाकडे मागण्यावरून व शासनासोबत चर्चा करून आशा वर्कर्सचे मानधन तिप्पट करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संघटनेला दिले होते. मात्र, त्यांनी अद्याप ही कुठली कारवाई केलेली नाही. या आंदोलनात राजन गावंडे, संध्या डीवरे, रुपाली धांडे, शीतल दंदी आदी उपस्थित होते.