ETV Bharat / state

Shushma Andhare On Devendra Fadnavis: गृहमंत्री फडणवीस कुचकामी ठरत आहेत का? सुषमा अंधारे यांचा सवाल - संदीप देशपांडे हल्ला प्रकरण

संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यातून ते बचावले. मात्र, या निमित्ताने गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे कुचकामी आहेत का? असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज उपस्थित केला.

Shushma Andhare
सुषमा अंधारे विरुद्ध देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 3, 2023, 4:33 PM IST

Updated : Mar 3, 2023, 5:36 PM IST

सुषमा अंधारे पीसी, अकोला

अकोला: शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी राजू सातव यांच्या पत्नी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर अकोल्यात शिंदे गटातील संपर्क प्रमुखांनी जिल्हा प्रमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ठाण्यात विभाग प्रमुखाची दिवसाढवळ्या हत्या झाली. आजचा मॉर्निंग वाक करीत असताना संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला. हे सगळे चित्र बघता, कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे. गृहमंत्री म्हणून कदाचित वर्कलोड जास्त असल्याने त्यांनी त्यांच्यावरील जबाबदारी दुसऱ्या नेत्यांकडे सोपवावी. मला अशी माहिती मिळाली की, देवेंद्र फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहे. गेल्या सहा महिन्यांत ते एकदा अकोल्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःकडेल भार कमी करून त्यांच्याकडील नेत्यांना संधी द्यावी. त्याच्याकडील अनेक जण संधी शोधत आहेत. मी तर असे म्हणेन की त्यांच्याकडील जबाबदारी ही इकडचे बच्चू कडू यांना गृहमंत्री पद देऊन आपल वर्कलोड कमी करावं. परंतु, ते बच्चू कडूवर ते अन्याय करीत आहे. यानिमित्ताने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. त्यांनी या पदाला न्याय देण्यासाठी इतरांना संधी दिली पाहिजे, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.

अंधारेंची बोचरी टीका: मला हक्कभंग समितीचा काही घोळ कळत नाही आहे. दोन तीन गोष्टी यांच्यामध्ये आहेत. हक्कभंगाचा प्रस्ताव आपल्या कडे कलम 104 किंवा 194 नुसार दोन्ही मंडळात सादर होतो, हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी आक्रमक झालेले आशिष शेलार, किंवा भाजपा हेच सर्व लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड राज्यपाल कोशारी बरडत होते. तेव्हा हक्कभंग सोडा, साधा निंदाजनक ठरावे ही का मांडत नव्हते. याचा अर्थ काढायचा का शेलार आणि या लोकांना बोलल की याना फार झोम्बतय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा जास्त मोठी लोक ही झाली आहेत का, असा प्रश्न शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला. हक्कभंगाच जर म्हणत असाल तर आशिष शेलार, मनगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, राज्यपाल कोशारी यांच्यावर हक्कभंग दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस हे तोंडावर बोट ठेवून चूप: संतोष बांगर यांच्यावर प्रज्ञा सातव यांनी आरोप तर केले आहेत. पण संतोष बांगर यांची आतापर्यंत कारकीर्द बघितली तर अधिकाऱ्यांना धमकवणे, कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, महिलेवर हात उचलणे, हे प्रकार त्यांच्यासाठी आम आहेत. तरीदेखील त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर चकार शब्द बोलत नाही. देवेंद्र फडणवीस हे तोंडावर बोट ठेवून चूप बसतात. फडणवीस यांचे व्हायलनट होणं सायलेंट होणं हे सिलेक्टिव्ह चालत राहत. हा एका अर्थाने सत्तेचा गौरव वापर आहे, याचा त्यांना जाब विचारला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

फडणवीस यांच्यावर निशाना: तुम्ही आमची गाय मारली तर आम्ही तुमची वासू मारू, अशी सूडबुद्धी शिवसेनेकडे नाही. मुळात शिवसेनेच्या दृष्टिकोनातून नवनवीन राणा एवढे महत्वाचे कॅरेक्टर ही नाही. नवनीत राणा, कंबोज किंवा सोमय्या हे सगळे सब कॉन्ट्रॅक्ट आहे. सब कॉन्ट्रॅक्टवर आम्ही बोलत नाही. आमचा विवेक जागा आहे. आम्ही प्रज्ञावान आहोत. आम्हाला सब कॉन्ट्रॅक्टवर बोलण्यापेक्षा आम्ही याचा मुख्य जो सूत्रधार आहेत, त्या देवेंद्र फडणवीस यांना विचारू, असे ही शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा: Cheating Gang Arrested: बच्चन, सचिन, धोनीच्या नावावर फसवणूक करणारी गॅंग गजाआड.. बनवायचे बनावट कागदपत्रे

Last Updated : Mar 3, 2023, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.