ETV Bharat / state

अकोला : संचारबंदी विरोधात व्यापारी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन - अकोल्यात संचारबंदी

राज्य सरकारने लावलेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. नेकलेस रोड येथे व्यापाऱ्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीनंतर व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये संचारबंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संचारबंदी विरोधात व्यापारी आक्रमक
संचारबंदी विरोधात व्यापारी आक्रमक
author img

By

Published : Apr 7, 2021, 8:44 PM IST

अकोला - राज्य सरकारने लावलेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. नेकलेस रोड येथे व्यापाऱ्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीनंतर व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये संचारबंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर राज्य शासनाने संचारबंदी रद्द केली नाही, तर व्यापारी स्वतःहून दुकाने उघडतील, असा इशारा देखील व्यापाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

राज्य सरकारने सुरुवातीला दोन दिवसांसाठी संचारबंदीचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर संचारबंदी अधिक तीव्र करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा वगळून, सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अकोल्यातील व्यापारी गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोज सकाळी आपल्या दुकानासमोर येतात, उभे राहतात आणि परत घरी निघू जात आहेत. या संचारबंदीमुळे आमचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, संचारबंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

संचारबंदी विरोधात व्यापारी आक्रमक

'शासनाचा आदेश येईपर्यंत दुकाने उघडू नयेत'

दरम्यान अकोल्यामध्ये आज व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळपर्यंत शासनाच्या नवीन गाईडलाईन येण्याची शक्यता आहे, त्याची माहिती आपल्याला देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी व्यापाऱ्यांना यावेळी दिले, तसेच जोपर्यंत शासनाच्या नव्या गाईडलाईन्स येत नाहीत, तोपर्यंत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडू नये, अशी विनंती देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना केली आहे.

हेही वाचा - 9 वी आणि 11 वीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांना मिळणार पुढील वर्गात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.