ETV Bharat / state

अकोला सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची सुनावणी सुरु,  मुख्य साक्षीदाराची नोंदविली साक्ष - rape

जिल्ह्यातील गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात बलात्कारानंतर करण्यात आलेल्या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर सुरु झाली आहे.

जिल्हा सत्र न्यायालय
author img

By

Published : Mar 7, 2019, 12:50 PM IST

अकोला - जिल्ह्यातील गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात बलात्कारानंतर करण्यात आलेल्या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर सुरु झाली आहे. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या समोर ही सुनावणी चालू आहे. मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

जिल्हा सत्र न्यायालय

या हत्याकांडात तरुण आणि तरुणीला बांधून ठेवून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर दोघांची हत्या करण्यात आली होती. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्यांकांडांची सुनावणी आता सुरु झाली आहे. जुने शहरातील रहिवासी असेलेले हे दोघे शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. त्यावेळी १३ जणांच्या टोळक्याने तरुणाला दोराने बांधून ठेवत तीच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दोघांचीही हत्या केली.

आरोपींनी त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर टाकून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने याने दोघे आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँन्ड यांच्या न्यायालयात सुरु झाली असून मंगळवारी मुख्य साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.

आरोपींच्या ५ ते ६ वकिलांनी मुख्य साक्षीदाराची उलटतपासणी केली. या प्रकरणात आणखी एका साक्षीदाराची १८ मार्चला साक्ष होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, तर हत्येसाठी वापरलेले शस्त्रही यावेळी दाखविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, लोखंडी रॉड, धारदार शस्त्र, २ दुचाकी व दोघांच्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.

undefined

आरोपींची नावे -

मनीष श्रीकृष्ण खंडारे (रा. डाबकी रोड), हुसेन खा, सुजात खा (गायगाव), नितीन देवराव मोरे (रा. डाबकी रोड), इमाम खा (रा. गायगाव), गुलाम आबीद गुलाम मुस्तफा (रा. गायगाव), अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मीठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर.

Intro:अकोला - गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात अमित-प्रतिक्षा यांना बांधून ठेवून प्रतिक्षा नामक मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर हत्याकांड करण्यात आले होते. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल ११ वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयात सुरु झाली असून मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविली.Body:जुने शहरातील रहिवासी अमित आणि त्याची मैत्रीन प्रतीक्षा (१६) हे दोघे जण शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. अमित-प्रतीक्षा दोघेही बसलेले असताना मनीष श्रीकृष्ण खंडारे रा. डाबकी रोड, हुसेन खा सुजात खा रा. गायगाव, नितीन देवराव मोरे रा. डाबकी रोड, इमाम खा सुजात खा रा. गायगाव, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा रा. गायगाव, अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मीठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर या १३ नराधमांनी अमितला दोराने बांधून ठेवत प्रतीक्षावर सामूहिक बलात्कार करून दोघांचीही हत्या केली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून ते आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँन्ड यांच्या न्यायालयात सुरु झाली असून मंगळवारी मुख्य साक्षीदाराची साक्ष तपासण्यात आली. त्यानंतर आरोपींच्या ५ ते ६ वकींलानी मुख्य साक्षीदाराची उलटतपासणी केली. या प्रकरणात आणखी एका साक्षीदाराची १८ मार्च रोजी साक्ष होणार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, तर हत्येसाठी वापरलेले शस्त्रही यावेळी दाखविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, लोखंडी रॉड, धारदार शस्त्र दोन दुचाकी व दोघांच्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.Conclusion:सूचना - या बातमीत सरकारी वकील यांनी बोलण्यास नकार दिल्याने कोर्टच्या बाहेरील व्हिज्युअल पाठवित आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.