अकोला - शहरातील आरोग्य नगर, बलोदे लेआऊट मधील उच्चभ्रू वस्तीतील कुंटनखान्यावर दामिनी पथक आणि पोलीस अधीक्षक यांच्या विशेष संयुक्त पथकाने छापा टाकला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांसह 99 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोग्य नगर, बलोदे लेआउट येथील घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती दामिनी पथक आणि पोलिस अधीक्षक मिलिंद बाहकर यांना मिळाली. त्यानुसार दोन्ही पथकानी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. त्याठिकाणी दोन पिडीत महिला, अश्विन साहेबराव शिरसाट, आकाश पुरूषोत्तम राहुलकार, अदक्ष बाळ सानप यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून एक होंडा कंपनीची ड्रिम यूगा दुचाकी (कमांक एम एच २८ ऐजी १६७३) किंमत अंदाजे 40,000 रूपये, अंगझडतीमध्ये 07 मोबाईल किंमत 52 हजार रुपये, रोख 7 हजार 710 रूपये असा एकूण 99 हजार 770 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.