ETV Bharat / state

अकोल्यात जीवघेणा खड्डा, स्थानिकांच्या सतर्कतेने वडिलांसह मुलगी बचावली - akola pit accident news

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. यामध्ये दुचाकीवरील वडील अन् मुलगी दोघेही पडल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

akola pit accident news
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता खड्डेमय
author img

By

Published : Feb 3, 2020, 12:59 PM IST

अकोला - शहरातील मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आज सकाळी एक दुचाकी पडली. यासोबतच दुचाकीवरील वडील आणि मुलगी दोघेही पडल्याने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यानंतर स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. हा खड्डयाचा आकार एवढा मोठा आहे, की संपूर्ण दुचाकी यामध्ये अडकली.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्ता खड्डेमय

ज्या खड्ड्यात ही दुचाकी पडली त्या खड्ड्यातून मात्र पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता. जेल चौक ते अग्रेसन चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता कच्चा झाल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.

टॉवर चौकातील पाडिया कॉम्प्लेक्सजवळ अशाच प्रकारचा खड्डा आहे. संबंधित खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या डबक्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने काही अपघात घडले आहेत.

आज सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना गाडी खड्ड्यात गेल्याने नियंत्रण सुटले आणि दोघेही पडले. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. ज्या खड्ड्यात त्यांची दुचाकी पडली त्यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. उड्डाणपूल कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाचे मात्र या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

Intro:अकोला - शहरातील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाच्या बाजूने असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात आज सकाळी टॉवर चौकाजवळील पाडिया कॉम्प्लेक्स जवळ दुचाकी पडली. या दुचाकीवरील बापलेकही पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. ज्या खड्ड्यात ही दुचाकी पडली त्या खड्ड्यातून मात्र पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतं होता.Body:जेल चौक ते अग्रेशन चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी पक्का असलेला रस्ता कच्चा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. टॉवर चौकातील पाडिया कॉम्प्लेक्स जवळ अशाच प्रकारचा खड्डा आहे. त्या खड्ड्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे या ठिकाणी खड्ड्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. एक वडील तिच्या मुलीला घेऊन शाळेत जात होते. त्यांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी त्या खड्ड्यात गेली. या दुचाकी सोबतच ते दोघे बापल एकही खाली पडले. सुदैवाने त्या दोघांनाही कुठलीच इजा झाली नाही. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. ज्या खड्ड्यात त्यांची दुचाकी पडली; त्यामधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. उड्डाणपूल कंत्राटदार आणि महापालिका प्रशासनाचे मात्र या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष होत आहे.

बाईट - पडलेले दुचाकीचालकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.