ETV Bharat / state

कमी जोखमीच्या लोकांवरही लक्ष द्या - पालकमंत्री बच्चू कडू - अकोला पालकमंत्री बच्चू कडू

अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत असतानाच जे कमी जोखमीचे व्यक्ती आहेत त्यांचेवरही आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश मंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री बच्चू कडू
पालकमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Jun 9, 2020, 9:51 PM IST

अकोला - शहरी भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील अति जोखमीच्या व दूरस्थ संपर्कातील कमी जोखमीच्या व्यक्तींची विगतवारी करा. अति जोखमीच्या व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात येत असतानाच जे कमी जोखमीचे व्यक्ती आहेत त्यांचेवरही आरोग्य यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश मंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन भवनात विविध आढावा बैठका घेतल्या. त्यात कोविड-१९ संदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी,, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मनपाने शहरात राबविलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत आत्तापर्यंत ६८ हजार जणांची तपासणी केली आहे. तसेच आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या तपासणीनंतर निकट संपर्कातील व्यक्ती सोडल्यास ७९६ लोक हे कमी जोखमीचे व दूरस्थ संपर्कातील आहेत. अशा लोकांच्यातही अन्य आजार असलेल्या व ज्येष्ठ नागरिक असलेल्या लोकांची वेगळी विगतवारी करून त्यांच्यावर विशेष लक्ष आरोग्य यंत्रणांनी द्यावे, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करा. डॉक्टर व रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणताही व्यक्ती आत जाता कामा नये. तसेच जेवण चांगले नसल्याच्या तक्रारी अद्याप येत आहेत, हा दर्जा सुधारण्यात यावा असेही निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील मृत्यूदर हा चिंताजनक असून तो कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच येत्या पावसाळ्यात हवामान बदलामुळे होणारे विविध आजार लक्षात घेता आरोग्य यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी निर्देश दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.