ETV Bharat / state

अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या पत्नीची चाचणी ‘निगेटिव्ह’; 3 कि.मी परिघातील भाग बंद - akola corona update

अकोला जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आता तरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

akola corona positive patient
अकोल्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाच्या पत्नीचा चाचणी ‘निगेटिव्ह’; तीन किमी परिघातील भाग ‘सिल’
author img

By

Published : Apr 7, 2020, 10:41 PM IST

अकोला - कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. रुग्णाच्या पत्नीचेही नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे, असे सूत्रांनी सांगितले. तसेच रुग्ण राहतो त्या ठिकाणचा तीन किलोमीटरचा परिसर बंद करण्यात आला आहे. घरोघरी तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातला पहिला कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण हा अकोला शहरात आढळला आहे. हा रुग्ण ज्या भागातील आहे त्या या भागाला केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील परिसर तसेच दोन किमीचा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सील’ करण्यात येणार आहे. त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरून कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

संबंधित भागाला बंद राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर आणि बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

मनपाचे आयुक्त संजय कापडणीस हे आता येथील मनपा आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत आरोग्य तपासणीसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचे पथक तयार करतील. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची तपासणी करतील. संपूर्ण परिसर निर्जंतूक केला जाईल. त्यासाठी मनपा मार्फत विशेष अभियान या भागात राबविण्यात येईल. प्रत्येक कुटूंबाची आरोग्य तपासणी होईल व माहिती घेतली जाईल, त्यासाठी येणारे आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोरोना दाखल झाला आहे, ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन आता तरी लोकांनी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.