ETV Bharat / state

अकोला: पीकविम्याच्या प्रश्नावर भाजप आमदार सावरकर यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

author img

By

Published : Aug 5, 2021, 4:49 PM IST

पीकविम्या प्रश्नी आज भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यात नुकसान भरपाई सर्व्हे करताना पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कमी नुकसानीचे पंचनामे कृषी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा विषय मांडण्यात आला. याप्रकरणी आमदार सावरकर यांनी पीमविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

MLA Savarkar meet insurance company
भाजप आमदार सावरकर अकोला जिल्हाधिकारी भेट

अकोला - पीकविम्या प्रश्नी आज भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. यात जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा तातडीने मिळावा यासाठी राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते. परंतु, नुकसान भरपाई सर्व्हे करताना पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कमी नुकसानीचे पंचनामे कृषी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा विषय मांडण्यात आला. याप्रकरणी आमदार सावरकर यांनी पीमविमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

माहिती देताना भाजप आमदार रणधीर सावरकर

हेही वाचा - एकमेकांची पाठ खाजवतात, तेच मला जास्त आवडते - अमृता फडणवीस

भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पिकांचे उत्पादन संपूर्ण नामशेष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पीकविमा कंपन्यांकडून अशा परिस्थितीत तातडीचा अंतरिम मोबदला (MID-SEASON ADVERSITY) शेतकऱ्यांना देण्याबाबत विमा कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यात, तसेच शासकीय नियमांत अंतर्भूत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीपोटी विमा कंपनीकडून तातडीचा अंतरिम मोबदला सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा, तसेच मूर्तिजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ५० टक्क्यांपेक्षाही अधिक पीक उत्पादनात घट होणार आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना केली.

जिल्ह्यात अतिवृष्टी शिवाय सततच्या पर्जन्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. नदी, नाल्यांना आलेल्या पुराचे पाणीसुद्धा शेतात येत असल्याने शेतातील पिके सतत पाण्याखाली येतात. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न होणे शक्य नाही. या परिस्थितीसोबतच पावसाळी हवामानाचासुद्धा पिकांवर मोठा दुष्परिणाम झाला आहे, या मुद्द्यांवर देखील जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. या अतिवृष्टी व पर्जन्यादरम्यान विमा कंपनीचे प्रतिनिधी तक्रार दाखल करण्यासाठी उपलब्ध नव्हते. विमा कंपनीचे पोर्टल बंद होते. जिल्ह्यात नेटवर्कचा खोळंबा होता, टोल फ्री दूरध्वनीवरून शेतकऱ्यांना तक्रारी देता आल्या नाहीत. ही पार्श्वभूमी लक्षात घेत शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत लेखी तक्रारी विमा कंपनी, कृषी विभाग, महसूल विभाग यांना देण्याचे वैयक्तिकरित्या आवाहन शक्य तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.

हेही वाचा - उपराजधानीत कोरोनानंतर डेंग्यूचे थैमान; पंधरा दिवसात १०६४ डेंग्यूचे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.