अकोला - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला भारत बंद मध्ये अकोल्यातही प्रतिसाद मिळत आहे. व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती नव्हे तर, तालुक्यातील इतरही बाजार समित्यांमध्ये कुठलेही व्यवहार आज झालेले नाही आहेत. त्यामुळे हा बंद याठिकाणी यशस्वी झाला आहे.
केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये देशभरात आज भारत बंद म्हणून हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शेतकरी संघटना यांच्यासह मजूर संघटना ही सहभागी झाले आहेत. व्यापाऱ्यांनी या बंदला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हा बंद यशस्वी पाहायला मिळत आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्णपणे शुकशुकाट राहिला. याठिकाणी कुठलेही व्यवहार होताना दिसला नाही. या बाजार समितीमध्ये मजूर, शेतकरी, आडते यांचा वावरही नव्हता. त्यामुळे या बंदला कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील इतरही ठिकाणी या बंदला पाठिंबा मिळत असून हा बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटना व व मजूर संघटना सरसावल्या आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला असला तरी इतर व्यापाऱ्यांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवली, असे चित्र अकोला शहरांमध्ये दिसत आहे.
![अकोला भारत बंद न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-02-apmc-wkt-7205458_08122020125201_0812f_01786_533.jpg)
![अकोला भारत बंद न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-02-apmc-wkt-7205458_08122020125201_0812f_01786_1046.jpg)