ETV Bharat / state

अकोला : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी मूर्तिजापूर येथे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी मूर्तिजापूरमध्ये आंदोलन

आज मूर्तिजापूर येथील बसस्थानक चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विदर्भसमर्थकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी मागणी या विदर्भवाद्यांनी यावेळी केली.

separate Vidarbha state demand in akola
separate Vidarbha state demand in akola
author img

By

Published : Aug 26, 2021, 8:11 PM IST

अकोला - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज मूर्तिजापूर येथील बसस्थानक चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ विदर्भसमर्थकांनी आंदोलन केले. या आंदोलनानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी मागणी या विदर्भवाद्यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया

मूर्तिजापूर येथील बस स्थानकाजवळ आंदोलन -

नागपूर येथे 9 ऑगष्ट क्रांतिदिनापासून तर 15 ऑगस्टपर्यंत चंण्डिका माता मंदिर येथे विदर्भ आंदोलन समितीतर्फे सात दिवसांचे डेरा आंदोलन उभारण्यात आले होते. ते आंदोलन सुरळीत पार पडले. त्याच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून २६ ऑगस्टरोजी विदर्भातील जनतेकडून स्वतंत्र विदर्भासाठी व न्याय व हक्कासाठी, विदर्भातील सर्व तालुक्यांत रास्तारोको व 'जेल भरो' आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मूर्तिजापूर येथील बस स्थानकाजवळील शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील चौकात करण्यात आले. हे आंदोलन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

या आहेत आंदोलकांच्या मागण्या -

  • स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी
  • पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर कमी करण्यात यावे
  • विदर्भात कोरोना काळातील वीजबील सरसकट माफ करण्यात यावे
  • विदर्भातील शेतकरी बांधवांना कृषिपंपाचे वीजबील नियमितपणे मोफत पुरविण्यात यावे
  • विदर्भातील जनतेला नियमितपणे 200 युनिटपर्यंत वीज पुरवठा मोफत द्यावा

हेही वाचा- नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.