ETV Bharat / state

पंतप्रधान मोदी यांनी एअरस्ट्राईकचे राजकारण करू नये - अबू आझमी - NAREDRA MODI

पाकिस्तानमधील एअरस्ट्राईकचे राजकारण करू नका... समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींचे पंतप्रधान मोदींना आवाहन.. वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार नसल्याचेही केले स्पष्ट

अबू आझमी
author img

By

Published : Mar 1, 2019, 11:11 PM IST

अकोला - पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 300 दहशतकवादी मारले गेले. मात्र, या ठिकाणी मारलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह तरी दाखवा, असा आवाज जनतेमधून उठत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचे राजकारण करू नये, असा सल्ला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज दिला आहे. ते शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अबू आझमी

तीन राज्याच्या निवडणुका हरल्यानंतर आणि साडेचार वर्ष सत्तेत अपयश आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचे राजकारण करीत आहे. निवडणुकीवेळी अशी वेळ आली आहे, वायु दलाची १२ विमाने गेली आणि हल्ले करून परत आली. मात्र, वायु दलाने हल्ला केलेल्या ठिकाणांवर केलेल्या हल्लात दहशतवादी ठार झाले का याबाबत जनतेला शंका आहे, यावरून आता आवाज उठत आहे, त्यामुळे भाजप सरकारने मारलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह तरी दाखवावे जेणेकरून जनतेच्या तोंडाला टाळे बसेल असे ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार नाही-

पुढे ते म्हणाले. राज्यामध्ये आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहोत. आम्ही काँग्रेसला एक जागा मागितली आहे. आम्हाला मतांचे विभाजन करायचे नसल्याने काँग्रेसने आम्हाला एक जागा द्यावी. आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत आणि त्यांच्याशी बोलण्याची वाट बघत आहे. काँग्रेसने आम्हाला एक जागा नाही दिल्यास आम्ही वेगळी आघाडी करुन ही निवडणूक लढविणार आहोत. परंतु, वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

मागील निवडणुकीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी केली होती. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार होता. त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या ही उमेदवाराने अर्ज भरला होता. यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले आम्ही सांगतो. नंतर परत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी फोन बंद करून आमच्याशी धोका केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले.

undefined

Intro:अकोला - पाकव्याप्त आतंकवाद्यांच्या ठिकाणी केलेल्या हल्ल्यामध्ये 300 आतंकवादी मारले गेले. नागरिक मारलेल्या तीनशे आतंकवाद्यांचे मृतदेह तरी दाखवा, असा प्रश्न उपस्थित करीत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचे राजकारण करू नये, असा सल्ला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज दिला आहे.

Body:साईबाबा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तीन राज्य हरल्यानंतर आणि साडेचार वर्ष सत्तेत अपयश आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतंकवादी यांच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याचे राजकारण करीत आहे. निवडणुकीवेळी अशी वेळ आली आहे, बारावी विमाने गेली आणि हल्ले करून परत आली. जनतेला शंका आहे, आवाज उठत आहे, त्यामुळे भाजप सरकारने मारलेल्या आतंकवाद्यांचे तरी मृतदेह दाखवावे जेणेकरून जनतेच्या तोंडाला काळे बसेल असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले. राज्यामध्ये आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहोत. आम्ही काँग्रेसला एक जागा मागितली आहे. आम्हाला मतांचे विभाजन करायचे नसल्याने काँग्रेसने आम्हाला एक जागा द्यावी. आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार आहोत आणि त्यांच्याशी बोलण्याची वाट बघत आहे. काँग्रेसने आम्हाला एक जागा जर दिली नाही, तर आम्ही वेगळी आघाडी करुन ही निवडणूक लढविणार आहोत. परंतु, वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.
मागील निवडणुकीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी केली होती. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार होता. त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या ही उमेदवाराने अर्ज भरला होता. यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले आम्ही सांगतो. नंतर परत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी फोन बंद करून आमच्याशी धोका केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले.

Conclusion:सूचना - या बातमीत व्हिडिओ पाठवीत आहे. ते वापरावे, ही विनंती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.