ETV Bharat / state

लालपरीला संकटातून काढा; विद्यार्थीनीने आदित्य ठाकरेंसमोर मांडले गाऱ्हाणे

author img

By

Published : Aug 29, 2019, 4:52 PM IST

युवासेना पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची जिल्ह्यात जनसंवाद यात्रा होती. त्यानिमित्ताने ते डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात विद्यार्थ्यांशी सवांद साधत होते. त्यादरम्यान दीपली गीते या विद्यार्थिनीने एसटी महामंडळाची थकबाकी शासनाने द्यावी, अशी मागणी केली. त्यावर आदित्य यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून विद्यार्थिनीच्या प्रश्नाला बगल दिली.

विद्यार्थीनी

अकोला- एसटी महामंडळाचे पंधराशे कोटी शासनाने द्यावे, जेणेकरून एसटीचे भले होईल, अशी मागणी एका विद्यार्थिनीने आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. दीपाली गीते असं या विद्यार्थीनीचे नाव आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतो, असे म्हणून तिच्या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे या विद्यार्थिनीचा पुरता हिरमोड झाला आहे. हे राजकीय उत्तर असून त्याने माझे समाधान झाले नसल्याचे यावेळी या विद्यार्थिनीने म्हटले.

सभेचे दृश्ये

युवा सेना पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची जिल्ह्यात जनसंवाद यात्रा होती. त्यानिमित्ताने ते डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृहात विद्यार्थ्यांशी सवांद साधत होते. त्यादरम्यान दीपली गीते या विद्यार्थिनीने त्यांना हा उपरोक्त प्रश्न केला होता. कार्यक्रमात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि खासगी शिकवणी वर्गातील वाढते शुल्क याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर, शाळा, महाविद्यालयातील व्यवस्थापन कोट्यामधून गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश का मिळत नाही ? वन मेरीट वन नेशन, याबाबत विद्यार्थ्यांनी आदित्य यांना प्रश्न विचारले.

Intro:अकोला - शिवसेनेच्या जनसवाद यात्रेत एका विद्यार्थ्यांनीने एसटी महामंडळाचे पंधराशे कोटी शासनाने द्यावे, जेणेकरून एसटीचे भले होईल, असा प्रश्न दीपली गीते हीने उपस्थित केला. ती विद्यार्थी प्रश्न विचारत असताना रडत होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी तिला याबाबत परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो, असे उत्तर दिले. त्यामुळे त्या विद्यार्थीनीचा हिरमोड झाला.Body:शिवसेनेचे युवा सेना पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनसंवाद यात्रानिमित्ताने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ सभागृह येथे विद्यार्थी सवांद कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. मुलिंच्या सुरक्षेचा प्रश्न, खासगी शिकवणी वर्गातील वाढते शुल्क, शाळा, महाविद्यालयातील मॅनेजमेंट कोटमधून गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश का मिळत नाही, वन मेरीट वन नेशन बाबतीत विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले.
मात्र, एक प्रश्न विचारत दीपाली गीते हिच्या डोळ्यात पाणी आले. एसटी महामंडळाची थकबाकी शासनाने द्यावी, असा प्रश्न तिने विचारले. त्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगु त्या विद्यार्थिनीच्या प्रश्नाला बगल दिली. राजकीय उत्तर असल्याचे तिने म्हणून याने माझे समाधान झाले नसल्याचे तिने सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.