अकोला - 500 रूपयांची लाच घेणाऱ्या एका रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी घरांचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी केली होती. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.
500 रूपयांची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला अटक
दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी करणाऱ्या रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.
500 रूपयांची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकाला अटक
अकोला - 500 रूपयांची लाच घेणाऱ्या एका रोजगार सेवकाला अकोला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी घरांचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी रोजगार सेवकाने 500 रूपयांची मागणी केली होती. ही कारवाई मूर्तिजापूर येथील एका चहा टपरीमध्ये करण्यात आली.
Intro:अकोला - रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी या घराचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी 500 रूपयांची लाच घेणाऱ्या रोजगार सेवकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. ही कारवाई मूर्तिजापूर येथील शिवाजी चौकातील माने यांचे चहा टपरीमध्ये करण्यात आली. Body:तक्रारदार यांचे रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मिळाल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या मजुरांनी या घराचे बांधकाम करताना मजुरी केली त्यांचे दोन मस्टरचे बिल काढून देण्यासाठी जनार्दन जयराम ढोरे (40, रोजगार सेवक, ग्रामपंचायत समशेरपूर), याने तक्रारदार यास 500 रुपयांची मागणी केली. ही मागणी मान्य नसल्याने तक्रारदार यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी मंगळवारी करण्यात आली. त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पंचासमक्ष तक्रारदाराकडील रक्कम आरोपी जनार्दन ढोरे यांनी स्वीकारली. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपीस रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एसीबीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Conclusion: