ETV Bharat / state

पूर्ववैमनस्यातून 25 वर्षीय तरुणाची हत्या; दोन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

अनेकदा तरुणांमध्ये लहान-मोठ्या कारणांवरून वाद होतात. या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात होऊन खूनासारख्या घटनाही होतात. अकोल्यात अशीच एक घटना समोर आली आहे.

dead
मृत
author img

By

Published : Feb 19, 2021, 7:46 AM IST

अकोला - गायत्री नगर येथे राहणाऱ्या गोपाल शिंदे या तरुणाची राष्ट्रीय शाळेच्या पटांगणात धारदार शास्त्राने हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून त्यातील दोघे अल्पवयीन आहेत.

पूर्ववैमनस्यातून 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली

आरोपींचा गायत्री नगरमध्ये राहणाऱ्या गोपाल शिंदे याच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे त्याच्या सोबत ते नेहमीच लहानसहान कारणावरून वाद घालत. याच कारणावरून गोपाल शिंदे याला प्रेम पांडे, शुभम जमदाडे व या दोघांच्या अल्पवयीन मित्रांनी फोन करून राष्ट्रीय टिळक शाळेत बोलावले. त्यानंतर त्यांनी गोपालवर चाकूने वार करून त्याला खाली पाडले व त्याच्यावर दगडानेही वार केले. यामध्ये गोपालचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गोपालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मडावी यांच्या सह फॉरेन्सिक टीम दाखल झाली. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दोघे अल्पवयीन आहेत. गोपालच्या आईने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खून करणे व इतर कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.