ETV Bharat / state

आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह; 32 जणांचे अहवाल तपासले - corona virus

जिल्ह्यात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. प्राप्त ३२ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटिव्ह तर अन्य ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

akola hospital
आठ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह; 32 जणांचे अहवाल तपासले
author img

By

Published : Apr 20, 2020, 10:09 AM IST

अकोला - कोरोना संदिग्ध 32 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात एक नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आहे. तर, अन्य 31 निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह अहवालात 23 प्राथमिक तपासणीचे तर आठ अहवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत. हे कर्मचारी आयोसोलेशन वार्डात कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय कर्मचारी निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची लागण झाली नाही, ही सुखद बाब आहे.

जिल्ह्यात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे. प्राप्त ३२ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटिव्ह तर अन्य ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार, आता जिल्ह्यात कोरोनाबाधित १६ रुग्ण असून त्यातील दोघे मृत आहेत. तर, अन्य १३ पैकी फेरतपासणीत ११ जण निगेटिव्ह आहेत, फेरतपासणीतील एक तर नव्याने तपासणी झालेले दोघे, असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा एक १४ वर्षीय मुलगा असून उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णाचा तो मुलगा आहे. रविवारपर्यंत एकूण ४०८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२६, फेरतपासणीचे ६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२ नमुने होते. रविवारी ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यात ३१ निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. एकूण ३९३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३११ तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २२ अहवाल आहेत. एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ३७७ आहे. रविवारअखेर जिल्ह्यात १५ अहवाल प्रलंबित असून ते सर्व प्राथमिक अहवाल आहेत. सद्यस्थितीत ८९ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४७० जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे. त्यापैकी १०० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण १९५ जण अलगीकरणात आहेत. १८८ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. तर विलगीकरणात आता ८६ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.