अकोला - एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची शनिवारी सकाळी 11 वाजता अकोला येथे सभा होणार होती. मात्र, सभेला तब्बल 5 तास उशिर झाला. ओवैसी यांचे हेलिकॉप्टर उशिरा पोहचल्याने सभेच्या ठिकाणी पोहोचण्यास त्यांना उशिर झाला. यावेळी ओवैसी यांनी आपले भाषण 6 मिनिटात उरकते घेतले.
एमआयएमचे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. रेहमान खान यांच्या प्रचार सभेसाठी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित केली होती. ही सभा सकाळी 11 वाजता होती. मात्र, सभेला 5 तास उशिर झाला. सभेच्या ठिकाणी ओवैसी 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचले.
हेही वाचा - धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलीने केला जन्मदात्याचा खून
यावेळी ओवैसी म्हणाले, परिस्थितीला सोमोरे जाण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील परिस्थिती बदलण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन ओवैसी यांनी केले. तसेच कोणीही आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहनही ओवैसी यांनी केले.
हेही वाचा - वंचितांचे संचित आम्ही बदलणार - केंद्रीय मंत्री अरविंद सावंत