अकोला - आज (सोमवार) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार चार जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष असून एक महिला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या आजपर्यंत 261 झाली आहे. त्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण हे 126 आहेत.
अकोल्यात आज चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यात तीन पुरुष व एक महिला आहे. ते फिरदौस कॉलनी, सुभाष चौक रामदासपेठ, मोमीनपुरा, ताजनापेठ व सावंतवाडी रणपिसेनगर येथील रहिवासी आहेत. रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत 261 रुग्ण झाले असून त्यापैकी 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 117 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 17 जणांचा मृत्यू आणि एकाने आत्महत्या असे मिळून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात आरोग्य पथक नागरिकांची तपासणी करत आहे. या रुग्णांच्या संख्येत सायंकाळी येणाऱ्या अहवालातून आणखी संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज प्राप्त अहवाल-१०८
पॉझिटीव्ह - ४
निगेटीव्ह - १०४