अकोला - कोरोना तपासणी अहवालात शनिवारी 24 जण पॉझिटिव्ह सापडले. तर रॅपीड अँटिजेन टेस्टमध्ये 14 असे एकूण 38 जण पॉझिटिव्ह सापडले. तसेच चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी आणखी 38 कोरोना बाधितांची बहर पडली आहे. त्यात दहा महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील हिवरखेड तेल्हारा येथील आठ जण, अकोट, खांबोरा बार्शिटाकली व जठारपेठ येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित बाबुळगाव जहागीर, बाळापूर, दहीहंडा, शिवाजी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर त्यात राम नगर व मलकापूर येथील प्रत्येकी दोन जण तर धाबा बार्शीटाकळी व काला सोसायटी, अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश या शनिवारच्या एकूण पॉझिटिव्ह अहवालात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.
दरम्यान, शनिवारी चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात. त्यात जेतवन नगर खंदान येथील ५८ वर्षीय पुरुष असून त्यांना २६ जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. शनिवारी दुपारनंतर तीन जणांचे मृत्यू झाले़. त्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालात ६९ वर्षीय पुरुष असून ते हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी आहे. त्यांना २३ जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच एका खासगी रुग्णालयात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यात एक ७७ वर्षीय महिला असून त्या नानक नगर निमवाडी येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ७२ वर्षीय पुरुष असून ते अंबिका लेआऊट ता. अकोट येथील रहिवासी आहे. त्यांचा उपचार घेतांना आज मृत्यू झाला.
दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून १० जणांना तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक जण अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालावर एक नजर
प्राप्त अहवाल- २७०
पॉझिटिव्ह- २४
निगेटिव्ह- २४६
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २३००+३६१=२६६१
*मृत्यू -१०९
*डिस्चार्ज- २११४
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह)-४३८