ETV Bharat / state

अकोला : जिल्ह्यात 29 नवे कोरोना बाधित तर एका रुग्णाचा मृत्यू

अकोला जिल्ह्यात रविवारी प्राप्त अहवालानुसार 29 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

akola hosital
akola hosital
author img

By

Published : Jul 27, 2020, 12:56 PM IST

अकोला - कोरोना तपासणी अहवालात रविवारी (दि. 26 जुलै) दिवसभरात 12 जण तर रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये 17 जण, असे एकूण 29 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

प्राप्त अहवालात 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात चार महिला व आठ पुरुष आहेत. त्यातील 3 जण हे सय्यदपुरा, पातूर येथील, दिवाली मैदान, पातूर येथील 2 जण तर उर्वरित रामनगर, चिंचखेड (ता. बार्शीटाकळी) व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. मराठा नगर, मोठी उमरी, काला चबुतरा सिटी कोतवाली व बाळापूर अकोला येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, शनिवारी रात्री रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश रविवारच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोला येथील रामदास पेठमधील इक्बाल कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष असून तो 22 जुलैला दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 4 , अकोल्यातील कोविड केअर सेंटरमधून चार जण, आयकॉन हॉस्पीटल येथून चार जण तर कोविड रुग्णालय मूर्तिजापूर येथून दोन जणांना अशा एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

रविवारी प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल - 337
पॉझिटिव्ह - 12
निगेटिव्ह- 325

रविवारपर्यंतची एकूण आकडेवारी
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 2 हजार 152 (स्वॅब चाचणी) + 260 (अँटीजेन चाचणी) - 2 हजार 412
मृत्यू - 101
डिस्चार्ज - 1 हजार 980
सक्रिय रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह) - 331

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.