अकोला - जिल्ह्यात रोज कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढली आहे. उपचारानंतर कोरोनातून बरे झालेल्या २३ रुग्णांना सोमवारी रात्री घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होण्याची आशा आहे.
प्रकृती सुधारल्यामुळे २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्वांना संस्थात्मक अलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यातील आठ जण खैर मोहम्म्द प्लॉट येथील तर तीन जण आंबेडकर नगर, तीन जण रामनगर सिव्हील लाईन्स येथील तर उर्वरीत ओल्ड आळशी प्लॉट, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, गोकुळ कॉलनी, तारफैल, भीमनगर, सराफा बाजार, जुनी शहर पोलीस चौकी, अकोट फैल या भागातील रहिवासी आहेत. आतापर्यंत १४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २७८
मृतांची संख्या -१८ (१७+१)
डिस्चार्ज - १४४
अॅक्टिव्ह रुग्ण - ११६