ETV Bharat / state

अकोला: कठडे तोडून ट्रक भिकुंड नदीत कोसळला; दोघांचा जागीच मृत्यू - अकोला ट्रक अपघात न्यूज

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने पुलाखालून बाहेर काढला.

पलटी झालेला ट्रक
पलटी झालेला ट्रक
author img

By

Published : Dec 7, 2020, 7:12 PM IST

अकोला - खामगावकडून अकोल्याच्या दिशेने येणारा ट्रक भिकुंड नदीत पडल्याने अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. ही अपघाताची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बाळापूरजवळ येथे घडली आहे.

खामगाववरून अकोल्याकडे ट्रक (क्रमांक सीजी - 04 - डीडी 7588) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. हा नियंत्रण सुटलेला ट्रक थेट पुलाचे कठडे तोडून नदीत पडला. या अपघातात ट्रकचालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर वाहतुकीची कोंडी-

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करीत अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने पुलाखालून बाहेर काढला. या अपघातात ट्रकचालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

पलटी झालेला ट्रक
पलटी झालेला ट्रक
महामार्गावरील खड्ड्यामुळे झाला अपघात!राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे आहेत. हे खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालक नेहमीच प्रयत्न करीत असतात. यामुळे बऱ्याचवेळा लहानमोठे अपघात होत असतात. हा अपघातही रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.