ETV Bharat / state

Akola Crime News: आई बाबाजवळ राहत नाही; रागातून मुलीने आईच्या चेहऱ्यावर फेकले चिकटद्रव्य

author img

By

Published : Mar 23, 2023, 10:59 AM IST

अकोला येथे एका 16 वर्षीय मुलीने आईच्या चेहऱ्यावर पंचर काढण्यासाठी चिटकवण्यात येणारे द्रव्य फेकल्याची घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये वाद आणि आईचा वडिलांजवळ राहण्यास नकार होती. याच रागातून तिने आईवर चिकट द्रव्याने हल्ला केला.

Akola Crime News
आईच्या चेहऱ्यावर फेकले चिकटद्रव्य

अकोला: बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. वेळोवेळी तिला वडिलांजवळ राहण्यास बोलावले. परंतू आईचा वडिलांजवळ राहण्यास नकार होती. याच रागातून तिने आईवर चिकट द्रव्याने हल्ला चढवला, असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीने आईच्या चेहऱ्यावर चिकटद्रव्य फेकल्यानंतर तिने पळ काढला. तिला पकडण्यासाठी नागरिकांनी ही प्रयत्न केला. मात्र, ती नागरिकांसह पोलीसांना चकमा देऊन पसार झाली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न: शहरातील जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या महिलेच्या चेहऱ्यावर पोटच्या १६ वर्षीय मुलीने जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मोर्णा नदीच्या मोठा पुलाजवळ आईशी चर्चा केली. मात्र, त्यांच्यात योग्य वार्तालाप झाला नाही. आई- वडिलांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. तेव्हापासून दोघेही पती-पत्नी वेगवेगळे राहतात. आई वडील वेगवेगळे राहत असल्याचे मुलीला आवडत नव्हते. तरीही त्या अल्पवयीन मुलीने आईला दोघांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. तिने अनेकदा दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या आईकडून तिला वेळोवेळी सोबत राहण्यासाठी नकार यायचा. मुलगी आईला समजविण्यासाठी गेली. परंतु पुन्हा आईचा नकार आल्याने तिचा राग अनावर झाला.

डोळ्यात द्रव्य गेल्याने इजा: यावेळी तिने सोबत आणलेले चिकट द्रव्य म्हणजेच दुचाकीचे पंचर काढण्यासाठी चिटकवण्यात येणारे द्रव्य (सोलेशन) आईच्या चेहऱ्यावर फेकले. हे द्रव्य तिच्या चेहऱ्यावर तसेच डोळ्यात पण गेल्याने तिला इजा झाली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तिथे एकच गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, नागरिकांनी घटनेवेळी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला.पण मुलींनी नागरिकांना चकमा देत पळ काढला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सद्यस्थितीत महिलेची प्रकृती चांगली असून तिचे डोळेही चांगले असल्याचे समजते.

हेही वाचा: Knife Attack On Student टायपिंग क्लास मधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करुन हल्लेखोर पळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.