अहमदनगर- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची शुक्रवारी सभा आयोजित होणार होती. मात्र, केवळ केंद्रीय स्तरीय समितीचे अधिकारी उपस्थित नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परीक्षित यादव आदीसह काही विभागाचे अधिकारीच उपस्थित होते.
हेही वाचा- व्हिडिओ व्हायरल: भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, गटारातून काढलेल्या भाज्या विक्रीला
दरम्यान, या बैठकीत नॅशनल हायवेसह अन्य केंद्र सरकारच्या योजना व कामासंदर्भात असलेल्या प्रश्नाची उत्तरे, माहिती घेण्यासाठी महत्त्वाचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे खासदारांनी जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. यानंतर दोन्ही खासदारांनी सभा तहकूब करुन पुढील बैठक 21 मार्चला बोलविण्यात आली.